शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेतील कांस्य विजेत्या विक्रम इंगळेची जडणघडण कोल्हापुरात

By सचिन भोसले | Updated: October 2, 2023 15:33 IST

कोल्हापूर : चीन (हँगजाऊ) येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत रोलर स्केटींग ३००० मीटर रिलेत मुळच्या कोल्हापूरच्या पण सध्या पुण्यात ...

कोल्हापूर: चीन (हँगजाऊ) येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत रोलर स्केटींग ३००० मीटर रिलेत मुळच्या कोल्हापूरच्या पण सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या विक्रम इंगळे याने सिद्धांत कांबळे (पुणे), अंनत कुमार (कर्नाटक) यांच्या साथीने कांस्य पदकाला गवसणी घातली. विक्रम सहा वर्षांच्या असल्यापासून त्याची स्केटींगमधील जडणघडण कोल्हापूरातील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्केटींग प्रशिक्षण केंद्रात झाली आहे.विक्रम सध्या कुटूंबासह पुण्यात स्थायिक झाला आहे. पण त्याची स्केटींगमधील श्री गणेशा कोल्हापूरात झाला. तो अगदी सहा वर्षाचा असताना त्याचे वडील राजेंद्र यांनी त्याला विवेकानंद काॅलेज परिसरातील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक.प्रा. डॉ.महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने येथील सरावास सुरुवात केली. त्याने राज्य, राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धात चमकदार कामगिरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्केटींग रिंग कोल्हापूरात आवश्यक होती. ही बाब जाणून वडील राजेंद्र व आई ज्योती इंगळे यांनी सर्व कुटूंबासह पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोमवारी विक्रमने कांस्य पदक पटकावून सार्थ ठरविला.विक्रमच्या या यशाबद्दल राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष तुळशी कुमार, सचिव नरेश शर्मा, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष पी.के.सिंग, सचिव राजेंद्र जोशी, सहसचिव डी. एस .बुलंगे यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३