सभापती निवडीत विजयसिंह माने यांचा मोलाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:22+5:302021-01-24T04:11:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : पंचायत समिती निवडणुकीतील विजयापासून ते सभापतिपदी निवड करण्यात बाळासाहेब माने शिक्षण समूहाचे ...

सभापती निवडीत विजयसिंह माने यांचा मोलाची साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : पंचायत समिती निवडणुकीतील विजयापासून ते सभापतिपदी निवड करण्यात बाळासाहेब माने शिक्षण समूहाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांचा मोलाचा वाटा आहे. तालुक्यात विकासकामे गतीने करून कामाचा नावलौकिक होण्यासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी दिली.
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स वाठार येथे सभापतिपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रदीप पाटील यांचा सत्कार संस्थाध्यक्ष विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने प्रमुख उपस्थित होते.
विजयसिंह माने म्हणाले, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी डॉ. पाटील यांच्या कर्तृत्वाची, निष्ठेची दखल घेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केला. कार्यकर्त्यांचा मान, सन्मान ठेवण्याचे काम जनसुराज्य पक्ष नेहमीच करीत आला आहे. पाटील यांच्या निवडीने भादोले जिल्हा परिषद मतदारसंघाचा गौरव झाला आहे. यावेळी बाबासाहेब मुळीक, प्रियांका सुतार, बाळासाहेब धनवडे, सागर शिंदे उपस्थित होते.
फोटो ओळी-अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटशन्स वाठार येथे हातकणंगले पंचायत समितीचे नूतन सभापती डॉ. प्रदीप पाटील यांचा सत्कार संस्थाअध्यक्ष विजयसिंह माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनीषा माने, सागर शिंदे, बाबासाहेब मुळीक, बाबासाहेब धनवडे उपस्थित होते.(छाया - आयुब मुल्ला)