विजय पाटीलने केले नाना ठोंबरेला चितपट
By Admin | Updated: March 9, 2015 23:53 IST2015-03-09T21:11:27+5:302015-03-09T23:53:43+5:30
द्वितीय क्रमांकाची जयपाल वाघमोडे (कोल्हापूर) विरुध्द समीर देसाई (पुणे)कुस्ती बरोबरीत. तृतीय क्रमांकाच्या लढतीत सागर लाड याने कोल्हापूरच्या धनाजी कुंभार यास अस्मान दाखविले,

विजय पाटीलने केले नाना ठोंबरेला चितपट
येळापूर : माळवाडी (ता. शिराळा) येथील घोडावली देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या विजय पाटील याने वारणेच्या नाना ठोंबरे यास ढाक डावावर चितपट करुन उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. द्वितीय क्रमांकाची जयपाल वाघमोडे (कोल्हापूर) विरुध्द समीर देसाई (पुणे) यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत सागर लाड याने कोल्हापूरच्या धनाजी कुंभार यास निकाल डावावर अस्मान दाखविले, तर घोडावली किताबाची चांदीची गदा अमर शिरसट याने गणेश शिर्के यास चितपट करुन जिंकली.
प्रारंभी कुस्ती आखाड्याचे पूजन हणमंत गायकवाड (गुरुजी), लक्ष्मण शिरसट, गुणवंत शिरसट, शिवाजी शिरसट, मारुती शिरसट, सचिन शिरसट या मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. चतुर्थ क्रमांकाच्या लढतीत विकास पाटील व विनोद शिंदे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाच्या लढतीत कुमार पाटील याने नामदेव केसरे यास एकचाक डावावर अस्मान दाखविले. मैदानातील इतर विजयी मल्लांमध्ये अमर पाटील, निखिल आस्कट, अमित कारंडे, भाऊ पाटील, कपिल पाटील, ऋषिकेश जाधव, संजय जाधव, महेश पाटील, कृष्णा घोडे, राहुल शिरसट, दत्ता बनकर, वैभव जाधव, संकेत पाटील यांचा समावेश आहे.
पंच म्हणून विठोबा लोहार, उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड, तानाजी चवरे, आनंदराव पाटील, जयवंत कडोले, कुमार कडोले यांनी काम पाहिले. मैदानात मनोज चिंचोलकर, सुरेश चिंचोलकर, उपसरपंच दिनकर दिंडे, राजू गोळे, आबा शिंदे, आनंदा इंगळे, आत्माराम सावंत, संपत कडवेकर, हणमंत शेळके, पोपट सावंत आदी उपस्थित होते. विकास शिरसट, मंगेश शिरसट, शिवाजी शिरसट यांनी संयोजन केले. (वार्ताहर)