विजय भोजे यांची निधी स्थगितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST2020-12-11T04:51:47+5:302020-12-11T04:51:47+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी नाकारला आहे. ...

Vijay Bhoje demands suspension of funds | विजय भोजे यांची निधी स्थगितीची मागणी

विजय भोजे यांची निधी स्थगितीची मागणी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी नाकारला आहे. तसे पत्र त्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नावे दिले.

गेले चार महिने या निधीवरून जिल्हा परिषदेत गोंधळ सुरू असून आता १५ डिसेंबरला याबाबत सुनावणी आहे. दरम्यान, सत्तारूढांनी गेल्या दोन दिवसांत यंत्रणा वेगवान करीत सुमारे ५०० कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून हा विषय त्यांनी संपवला आहे. आधी पत्रे दिल्यानुसार सदस्य विजय भाेजे यांनाही हा निधी मंजूर करण्यात आला. मात्र एकीकडे भाजप, जनसुराज्यच्या काही सदस्यांनी निधी नाकारला असताना हा निधी स्वीकारणे प्रशस्त न वाटल्याने भोजे यांनी न्यायालयीन निर्णयापर्यंत तो स्थगित करावा, असे पत्र दिले आहे.

Web Title: Vijay Bhoje demands suspension of funds