शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी गणना: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात १५ वेगवेगळ्या वन्य प्रजातींच्या प्राण्यांचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:19 IST

यावर्षी निसर्ग व वन्यजीव प्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यावरील प्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली

अनिल पाटीलसरुड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पोर्णिमेदिवशी रात्रीच्या वेळी झालेल्या पाणवठ्यावरील प्राणी गणनेत १५ वेगवेगळ्या वन्य प्रजातीच्या प्राण्यांचे दर्शन झाले आहे. या प्राणी गणने दरम्यान ३०८ प्राणी आढळल्याची नोंद झाली आहे. यामध्ये बिबटे, साळिंदर, हनुमान वानर, गवा, रानडुक्कर, अस्वल, भेकर, ससा, रानकुत्रे आदी वन्य प्राण्यांचा समावेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्याचा समावेश आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षे प्राणी गणना करता आली नाही. परंतू यावर्षी मात्र निसर्ग व वन्यजीव प्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यावरील प्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली. या व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव विभागाच्या वतीने बुद्ध पोर्णिमेच्या रात्री चांदण्याच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरील प्राणी गणना करण्यात आली. या गणनेत कोल्हापूर , सांगली , सातारा या तीन जिल्ह्यातील ३० हून अधिक स्वंय सेवकांनी स्वंयस्फूर्तीने सहभाग घेतला.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत व उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणी गणनेचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी प्रकल्पातील पाणवठ्यावर ५० मचाण बांधण्यात आली होती. या मचाणावरून रात्रीच्या वेळीस पाणवठ्यावर येणारे वन्यप्राणी प्रत्यक्षात पाहुन ही गणना करण्यात आली. यावेळी या प्रकल्पात ३०८ प्राण्यांची नोंद झाली असून १५ वेगवेगळ्या प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याची माहिती वन्यजीव विभागाच्यावतीने देण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीforest departmentवनविभाग