गुणवत्तेसाठी विद्या परिषदेचे सहकार्य
By Admin | Updated: January 22, 2015 00:11 IST2015-01-21T23:16:23+5:302015-01-22T00:11:30+5:30
एन. जे. पवार : शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत सत्कार

गुणवत्तेसाठी विद्या परिषदेचे सहकार्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक धोरणे व दिशा निश्चितीसाठी विद्या परिषदेने मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, सोमवारी आपल्या कृतज्ञतापूर्ण भावना व्यक्त केल्या. विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक राजर्र्षी शाहू सभागृहात झाली. बैठक संपल्यानंतर कुलगुरू डॉ. पवार यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, बीसीयुडी संचालक डॉ. अर्जुन राजगे यांचा विद्या परिषदेतर्फे सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य विद्या परिषद करते. वाद-प्रतिवादाला व्यक्तिगत संघर्षाचे रूप येऊ न देता विद्यापीठाचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक हित जोपासण्याला सर्वांचेच प्राधान्य राहिले. विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमधील सुधारणा करण्याचा विषय हा संवेदनशील होता. त्यासाठी विद्या परिषदेने घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली सुविधा निर्माण करू शकलो.
डॉ. भोईटे म्हणाले, सर्वच सहकाऱ्यांसमवेत काम करताना जी एकतानता आणि एकवाक्यता जुळली, त्याला तोड नाही. डॉ. राजगे म्हणाले, विद्यापीठात माझ्यापरीने परिपूर्ण योगदान देण्याचा मी प्रयत्न केला. काही कटू निर्णय घेण्याची वेळ आली; परंतु वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता कधी येऊ दिली नाही. यावेळी डॉ. डी. के. मोरे, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील,
प्रा. जे. एस. पाटील, डॉ. एस. ए. पाटील यांची भाषणे झाली.
धनंजयराव गाडगीळ कॉलेजला स्वायतत्ता...
साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ कॉलेज आॅफ कॉमर्सला प्रदान करावयाच्या स्वायतत्तेस मान्यता देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेला शिफारस करण्याबाबत आज विद्या परिषदेच्या बैठकीत शिफारस करण्यात आली.