आमदार आसगावकर हे विजयानंतर शनिवारी कोल्हापुरात येणार आहेत. ताराराणी चौकातून मिरवणूक सुरू होईल. राजीव गांधी पुतळा, दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे येऊन अजिंक्यतारा कार्यालयासमोर मिरवणूक विसर्जित होईल. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्ष महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सांगरूळ येथे विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
जयंत आसगावकर यांची आज विजयी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST