शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय, कोल्हापुरात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी   

By संदीप आडनाईक | Updated: June 10, 2024 05:25 IST

Kolhapur: टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या १९व्या सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवताच कोल्हापुरात रविवांरी मध्यरात्री क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. या क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला.

- संदीप आडनाईक कोल्हापूर - टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या १९व्या सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवताच कोल्हापुरात रविवांरी मध्यरात्री क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. या क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुण क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना झाला. याच मैदानावर भारताने आयर्लंडला पराभवाचं पाणी पाजलं होते. पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच या मैदानावर खेळला. एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाने स्पर्धेतील आपली घोडदौड सुरू ठेवली. 

विजयाची चाहूल लागताच अनेक तरुणांनी आपला मोर्चा चौकाकडे वळवला. विजय जवळ येईल तसे राष्ट्रध्वज व भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली.  स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले. विजयावर शिक्कामोर्तब होताच एकच जल्लोष, आतषबाजी करण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानkolhapurकोल्हापूरICC World T20आयसीसी विश्वचषक टी-२०Team Indiaभारतीय क्रिकेट संघ