व्हेंटिलेटर संपले, ऑक्सिजन बेडही अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:30+5:302021-05-11T04:24:30+5:30

भाारत चव्हाण / कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी काही दिवस वाढत राहिली तर रुग्णालयांतून उपचार मिळणे अवघड ...

Ventilator exhausted, oxygen bed too difficult | व्हेंटिलेटर संपले, ऑक्सिजन बेडही अवघड

व्हेंटिलेटर संपले, ऑक्सिजन बेडही अवघड

भाारत चव्हाण / कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी काही दिवस वाढत राहिली तर रुग्णालयांतून उपचार मिळणे अवघड होणार आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील व्हेंटिलेटर बेड संपले असून ऑक्सिजन बेडदेखिल फुल्ल होत आले आहेत. त्यामुळे नजीकचा काळ आरोग्य प्रशासनाच्या दृष्टीने खूपच कठीण आणि आव्हानात्मक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तसेच महानगरपालिका क्षेत्रात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मरणाऱ्यांची संख्याही ५० च्या आसपास आहे. बहुतेक सर्वच रुग्ण व्हेंटिलेटरवर असतानाच दगावले गेले आहेत. त्यामुळे कोरोनाने नवीन रुग्णांचा आणि मृत्यूशी झगडणाऱ्यांचा चांगलाच फास आवळला आहे. मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे एक कडवे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर आहे.

महानगरपालिका क्षेत्रात जवळपास अडीच हजार कोरोनाबाधित रुग्ण आपापल्या घरी राहूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत म्हणून तर आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे, अन्यथा केव्हाच गोंधळ निर्माण झाला असता; परंतु दिवसागणिक वाढणारे नवीन रुग्ण आणि प्रकृती खालावणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने व्हेंटिलेटर बेड आता शिल्लक राहिलेले नाहीत. ऑक्सिजन बेडसुद्धा जेमतेम शिल्लक आहेत. त्यामुळे पुढील काळात व्हेंटिलेटर तर मिळणार नाहीतच शिवाय ऑक्सिजन बेड मिळणे अवघड होईल.

कोविड केअर सेंटर जबाबदार अधिकारी फोन क्रमांक बेडची क्षमता

शिवाजी विद्यापीठ डीओटी - डॉ. प्रकाश पावरा ८१८०८७१३२० ३५०

शिवाजी विद्यापीठ हॉस्टेल क्र.१- डॉ. नीलेश लांब ७७७६०३९५५५ १२१

शिवाजी विद्यापीठ हॉस्टेल क्र.२ - डॉ. सुशांत रेवडेकर ९७६४६४९६६६ १४०

शिवाजी विद्यापीठ हॉस्टेल क्र.३ - डॉ. नीलेश लांब ७७७६०३९५५५ १२५

शेंडा पार्क डॉ. विजय मुसळे ९४२३२१३०१२ ५६

आयसोलेशन हॉस्पिटल - डॉ. रमेश जाधव ९४२११११५४४ ७१

राजोपाध्येनगर कोविड सेंटर- डॉ. राजेश औंधकर ९४२३२८१२३२ ३०

व्हीजन चॅरिटेबल ट्रस्ट (सायबर) - संताजी घोरपडे ९६०७५६००५६ २००

कसबा बावडा पॅव्हेलियन - डॉ. मनाली मिठारी ९९६०९३४४४४ ४४

व्हाईट आर्मी जैन बोर्डिंग- अशोक रोकडे ९८५००७९८०१ ५०

पंजाबराव देशमुख हॉस्टेल - डॉ. निखिल पाटील ९८५०६५६६६४ ७०

-महापालिका क्षेत्रातील बेडची स्थिती -

बेडचा प्रकार एकूण व्यस्त शिल्लक

नॉन ऑक्सिजन - ६२४ ४०५ २१९

ऑक्सिजन बेड १००९ ९२६ ८३

आयसीयू बेड ३११ २८१ ३०

व्हेंटिलेटर बेड १५२ १५२ ००

Web Title: Ventilator exhausted, oxygen bed too difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.