शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

‘सीपीआर’ला लवकरच व्हेंटिलेंटर

By admin | Updated: February 16, 2015 00:20 IST

जिल्हा नियोजनची मदत : वैद्यकीय संचालनालयाची तांत्रिक मंजुरी लवकर आवश्यक

संदीप खवळे - कोल्हापूर --गोरगरिबांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला ‘डीपीडीसी’च्या माध्यमातून व्हेंटिलेटरसाठी पन्नास लाख रुपये मिळणार आहेत़ या रुग्णालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार ‘डीपीडीसी’ने नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे़; पण सीपीआरचे डीपीडीसीकडे लेखाशीर्ष नसल्यामुळे हा निधी प्राप्त करण्यासाठी या प्रस्तावास वैद्यकीय संचालनालयाची तांत्रिक मंजुरी मिळणे आवश्यक आहे़ तांत्रिक मंजुरीनंतर लवकरच ‘सीपीआर’मध्ये ३१ मार्चपूर्वी व्हेंटिलेटर उपलब्ध होतील़ सीपीआरचे अधिष्ठाता डॉ़ दशरथ कोठुळे यांनी साधनसामग्री खरेदीसाठी पन्नास लाख रुपये निधीची मागणी करणारा प्रस्ताव डीपीडीसीकडे सादर केला होता़ या प्रस्तावास मान्यता दिल्याचे पत्र डीपीडीसीने सीपीआरला दिले आहे़ डॉ़ दशरथ कोठुळे यांनी हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण संचालनालयास पाठविलेला आहे़ त्याला वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने मंजुरी दिल्याचे समजते़ तांत्रिक मंजुरीनंतर या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर ३१ मार्चपर्यंत सीपीआरमध्ये व्हेंटिलेटर मिळतील़ सध्या सीपीआरमध्ये तेरा व्हेंटिलेंटरची गरज आहे़ अनेक व्हेंटिलेटर बंद आहेत़ त्यामुळे डीपीडीसीच्या ५० लाख रुपयांच्या मदतीने सीपीआरमध्ये व्हेंटिलेटर यंत्रणेला गती मिळणार असल्याचे सांगितले जाते. कायमस्वरूपी लेखाशीर्ष हवे ‘डीपीडीसी’कडे सीपीआरचे लेखाशीर्ष नसल्यामुळे डीपीडीसीकडून सीपीआरला निधी मिळण्यासाठी अडचण येत आहे़ त्यामुळे सीपीआरचे डीपीडीसीकडे कायमस्वरूपी लेखाशीर्ष तयार करण्यासाठी वैद्यकीय संचालनालय आणि वित्त व नियोजन विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ दशरथ कोठुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, यावर्षी व्हेंटिलेटरसाठी डीपीडीसीने ५० लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे़ तांत्रिक मंजुरीसाठी हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविलेला आहे़ या प्रस्तावास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची मंजुरी येत्या दोन दिवसांत मिळण्याचे संकेत आहेत़ तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर सीपीआरमध्ये लवकरच व्हेंटिलेटर उपलब्ध होतील़