शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’चा थरार सहा जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:04 IST

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ ...

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला पुन्हा एकदा रंगणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूंसह नागरिकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे.लोकप्रियतेच्या ‘माईल स्टोन’ ठरलेल्या या महामॅरेथॉनमध्ये आपला ठसा उमटविण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यांतील हजारो धावपटू गेल्या काही महिन्यांपासून पूर्वतयारी म्हणून मैदानांवर परिश्रम करीत आहेत. विशेष म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करण्यासाठी राज्यभरातील धावपटू, प्रतिष्ठित नागरिक, महिला व उदयोन्मुख खेळाडूंत अक्षरश: चढाओढ लागली आहे. गेल्या वर्षी क्रीडानगरी अर्थात कोल्हापुरात या महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर झालेल्या या महामॅरेथॉनमध्ये धावपटूंनी नोंदविलेली वेळ अचूक मिळाली. त्यामुळे ‘लोकमत’ने वापरलेल्या तंत्रज्ञानाचीही चर्चा धावपटूंमध्ये दुसºया पर्वातही सुरू आहे.यंदाची कोल्हापुरातील महामॅरेथॉनही संस्मरणीय ठरेल, असा विश्वास धावपटूंत आहे. तिची तयारी करणाºया धावपटूंनी शहरातील अनेक मैदाने, रस्ते अगदी पहाटेपासून फुलून गेलेली असतात. विशेषत: शिवाजी विद्यापीठ परिसर, रंकाळा तलाव, ताराबाई पार्क परिसर, टी. ए. बटालियनचा परिसर, पंचगंगा नदी परिसर, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग, राधानगरी मार्ग, गांधी मैदान, दुधाळी, शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर-गगनबावडा, आदी ठिकाणी भल्या पहाटेपासून धावपटू कसून सराव करीत असल्याचे चित्र आहे. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत या हेतूने आयोजित ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाºयांसाठी) १० कि.मी.ची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ कि.मी. (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ३ कि.मी. अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवण्यात आला आहे. नकाशाच्या मेडलबाबत उत्सुकताया मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली पदके (मेडल्स) देण्यात येणार आहेत. नाशिक येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर व पुणेमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा तयार होणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून ही मेडल्स पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे. त्यामुळे या पदकाबद्दल धावपटूंना वेगळे आकर्षण आहे. पदक म्हटले की ते गोलाकार असते. मग ते सोने, चांदी अथवा कांस्य असो. मात्र, ही परंपरा खंडित करीत ‘लोकमत’ने सर्वांना भावेल असे पदक धावपटूंना पहिल्या पर्वापासून देण्यास सुरुवात केली. धावपटूंनाही या मेडल्सचे मोठे अपु्रप वाटत आहे. यंदा नव्याने सहभागी होणाºया धावपटूंना हे मेडल म्हणजे आकर्षण बनून राहिले आहे.नकाशाच्या मेडलबाबत उत्सुकताया मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली पदके (मेडल्स) देण्यात येणार आहेत. नाशिक येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर व पुणेमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा तयार होणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून ही मेडल्स पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे. त्यामुळे या पदकाबद्दल धावपटूंना वेगळे आकर्षण आहे. पदक म्हटले की ते गोलाकार असते. मग ते सोने, चांदी अथवा कांस्य असो. मात्र, ही परंपरा खंडित करीत ‘लोकमत’ने सर्वांना भावेल असे पदक धावपटूंना पहिल्या पर्वापासून देण्यास सुरुवात केली. धावपटूंनाही या मेडल्सचे मोठे अपु्रप वाटत आहे. यंदा नव्याने सहभागी होणाºया धावपटूंना हे मेडल म्हणजे आकर्षण बनून राहिले आहे.अल्प शुल्कात बक्षिसांची लयलूटप्रकार शुल्क अर्ली बर्ड शुल्क मिळणारे साहित्य३ कि.मी. ४०० रु. ४०० रु. टी-शर्ट गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट५ कि.मी. ६०० रु. ४९० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट१० कि.मी. १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट२१ कि.मी १२०० रु. ११०० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट२१ कि.मी. १,००० रु. १,००० रु. टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्टएकूण सहा लाखांची बक्षिसे आणि बरेच काहीवयोगट वर्गवारी प्रथम द्वितीय तृतीय१८ ते ४५ पुरुष (खुला) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.१८ ते ४० महिला (खुला) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.४० वर्षांवरील महिला (प्रौढ) भारतीय २५,००० २०,००० १५,००० रु.१८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू) २०,००० १५,०००१८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू) २०,००० १५,०००वयोगट वर्गवारी प्रथम द्वितीय तृतीय१८ ते ४५ वयोगट पुरुष (खुला) भारतीय १५,००० १२,००० १०,०००१८ ते ४० वयोगट महिला (खुला) भारतीय १५,००० १२,००० १०,०००४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ गट) भारतीय १५,००० १२,००० १०,०००४० वर्षांवरील महिला (प्रौढगट) भारतीय १५,००० १२,००० १०,०००१८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू ) १५,००० १०,०००१८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू) १५,००० १०,०००