कोल्हापुरातील वाहनांना पासचा काहीच फायदा नाही
By Admin | Updated: May 22, 2015 00:55 IST2015-05-22T00:54:53+5:302015-05-22T00:55:16+5:30
प्रवेशकर प्रश्न : वगळलेल्या बेळगाव, सिंधुदुर्ग, कारवारला पुन्हा कराची झळ

कोल्हापुरातील वाहनांना पासचा काहीच फायदा नाही
कोल्हापूर : मालवाहतूक वाहनांसाठी गोवा राज्याने आकारलेला प्रवेश कर (एंट्री टॅक्स) हा कोल्हापूर जिल्ह्णाला पूर्वीपासूनच आहे. त्याचा काही फायदा नाही उलट, या प्रवेश करामधून वगळण्यात आलेल्या बेळगांवसह कारवार, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्णांना आता या कराची पुन्हा झळ बसणार आहे. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तीन जिल्ह्णांना प्रवेशकरामधून वगळले होते.
कोल्हापूर जिल्ह्णातून रोज मालवाहतूक (उदा. ट्रक, टेम्पो, टँकर) जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गोवा येथे केला जातो. गोवा सरकारने परराज्यांतून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांसाठी प्रवेशकर लागू केलेला आहे. रोज कोल्हापूर जिल्ह्णातून साधारणत: शंभर ते सव्वाशे, सिंधुदुर्गमधून २० ते २५ , बेळगावमधून ७० ते ८० तर कारवारमधील छोटे-मोठे टेम्पो अशा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आहे. विशेषत : कोल्हापूर व बेळगांव या जिल्ह्णामधून रोज गोवा येथे भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जास्त होतो. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी या चार जिल्ह्णातील मालवाहतूक करणाऱ्या संघटनांनी त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन प्रवेश कर रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवेश कर रद्द करतो, असे आश्वासन दिले होते, पण, पर्रीकर सरकारने कोल्हापूर जिल्हावगळून तीन जिल्ह्णांचा प्रवेश कर रद्द केला. या विरोधात प्रवेश करप्रश्नी दीड वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्णातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गोव्याला सहा दिवसांसाठी बंद केला होता. दरम्यान, गोवा सरकारने आता या जिल्ह्णांना एक जूनपासून प्रवेश करामध्ये नियमित पास देण्याचे ठरविले आहे परंतु, कोल्हापुरातील मालवाहतूकदारांना या नियमित पास सवलतीचा कोणताही फायदा होणार नाही.
अशी होतेय प्रवेश कराची आकारणी...
वाहनांचा प्रकारदर (रुपयांत)
चार चाकी २५० रुपये
सहा चाकी५०० रुपये
दहा /१२ चाकी१००० रुपये
प्रवेश कराबाबत दोन वर्षे लढा दिला. त्यासाठी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर बैठक झाली. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्णाला प्रवेशकरामधून वगळतो, असे आश्वासन दिले होते, पण तसे झाले नाही. हा प्रवेशकर आम्ही ग्राहकांच्या खिशांमधून घेतो. उलट, आता या प्रवेशकरामुळे तीन जिल्ह्णांवर अन्याय झाला आहे तेथील मालवाहतूकदार संघटनांनी याविरोधात उठाव केला पाहिजे. - सुभाष जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर असोसिएशन.