वाढदिवसावेळीच हाणामारीत वाहनांची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:00+5:302021-02-23T04:37:00+5:30

कोल्हापूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरात लावलेल्या गाण्याच्या कारणावरून चार युवकांनी गोंधळ माजवत परिसरातील काही दुचाकींची काठी व दगडाने मोडतोड ...

Vehicle wreckage during a birthday party | वाढदिवसावेळीच हाणामारीत वाहनांची मोडतोड

वाढदिवसावेळीच हाणामारीत वाहनांची मोडतोड

कोल्हापूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरात लावलेल्या गाण्याच्या कारणावरून चार युवकांनी गोंधळ माजवत परिसरातील काही दुचाकींची काठी व दगडाने मोडतोड तसेच घरावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. ही घटना रविवारी रात्री मोरेवाडी येथे घडली. या हल्ल्यामध्ये संपत काकासाहेब जोगदंडे (रा. सनगर धनगर सोसायटी, मोरेवाडी) हे जखमी झाले. याप्रकरणी चौघा संशयित युवकांवर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल प्रमोद शिंदे (रा. सनगर धनगर सोसायटी, मोरेवाडी) यांच्या लहान मुलाचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यांनी काही मित्रांना बोलावले होते. घरात जेवणाच्या कार्यक्रमावेळी गाणी लावण्याच्या कारणावरून वाद उफाळला. त्यावेळी चार युवकांनी रागाच्या भरात परिसरात उभ्या केलेल्या काही दुचाकींची काठी व दगडाने मोडतोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच रमाबाई सदाशिव जोगदंडे यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात दगड लागल्याने संपत जोगदंडे हे जखमी झाले. याप्रकरणी अनिल शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बापू ऊर्फ रियाज सलीम शेख याच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Vehicle wreckage during a birthday party