वीज बिल माफीसाठी उद्या कोल्हापुरात वाहन रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:41+5:302021-01-08T05:14:41+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी उद्या, गुरुवारी कोल्हापूर शहरातून वाहन रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती, वीज बिल ...

वीज बिल माफीसाठी उद्या कोल्हापुरात वाहन रॅली
कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी उद्या, गुरुवारी कोल्हापूर शहरातून वाहन रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती, वीज बिल भरणार नाही कृती समितीचे संयोजक निवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लॉकडाऊनच्या काळातील सहा महिन्यांची संपूर्ण बिले माफ करण्याची मागणी राज्यातील वीज ग्राहकांची आहे. मात्र शासनाने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. या अन्यायाविराेधात आता जनता रस्त्यावर उतरली आहे. व्यापक आंदोलनाचा एक भाग म्हणून उद्या, वीज बिल भरणार नाही कृती समितीच्यावतीने वाहन रॅली काढून सरकारला जागे करणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपले उपलब्ध असेल ते वाहन घेऊन रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन निवास साळोखे यांनी केले आहे. रॅलीत हजारो वाहने सहभागी होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली फिरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सांगता होणार आहे.
यावेळी बाबा पार्टे, प्रा. जालंदर पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील, सुभाष जाधव, जयकुमार शिंदे, बाबा इंदुलकर, अशोक ढेंगे, सुरेश जरग, संभाजी रणदिवे, विलास तानुगडे, चंद्रकांत ओतारी आदी उपस्थित होते.
रॅलीचा मार्ग असा- गांधी मैदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, सी. पी. आर चौक, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, उमा टॉकीज, शाहू मिल चौक, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, शाहू नाका, तावडे हॉटेल, कावळा नाका, स्टेशन रोड, जिल्हाधिकारी कार्यालय.