शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घराघरांत साजरा झाला रानभाज्या महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:14 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा महोत्सव निसर्गप्रेमी नागरिकांनी स्वगृही राहून स्वतःच्या कुटुंबासमवेत साजरा केला. तसे आवाहन निसर्गमित्रतर्फे करण्यात आले होते.

ठळक मुद्देघराघरांत साजरा झाला रानभाज्या महोत्सवनिसर्गमित्रला मिळाली विविध रानभाज्यांची भेट, आवाहनाला भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर :गेली १० वर्षे निसर्गमित्र परिवाराच्या वतीने रानभाज्या ओळख व संवर्धनाचे काम सातत्याने सुरू आहे. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सर्वांना कळावेत, त्यांची ओळख व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्या महोत्सव घेण्यात येतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा महोत्सव निसर्गप्रेमी नागरिकांनी स्वगृही राहून स्वतःच्या कुटुंबासमवेत साजरा केला. तसे आवाहन निसर्गमित्रतर्फे करण्यात आले होते.यालाच प्रतिसाद देत आज, दि. ९ ऑगस्ट रोजी गिरगाव येथील मोहन जाधव यांच्या कुटुंबीयांनी स्वतः अंगणात व शेतात उगवलेल्या १० प्रकारच्या औषधी रानभाज्या निसर्गमित्रला भेट म्हणून दिल्या.

यामध्ये कस्तुरी मोहन जाधव हिने पुढाकार घेऊन ही भेट निसर्गमित्रचे अनिल चौगुले व पराग केमकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्याबद्दल कस्तुरीला निसर्गमित्रच्या वतीने औषधी रानभाज्या पुस्तक देऊन पशुवैद्यकीय अधिकारी धनाजी काटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.हॉटेलमध्ये रानभाज्यांची भजीगगनबावडा तालुक्यातील साळवण येथून मनोज सूर्यवंशी यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये केना व आघाडा या रानभाज्यांची भजी विक्रीला ठेवली होती, त्याचा खवय्यांनी फडशा पाडला.घराघरात महोत्सवबेलबाग, मंगेशकरनगर, महालक्ष्मीनगर, मंडलिक पार्क, राजारामपुरी, गिरगाव, पाचगाव, फुलेवाडी येथील निसर्गप्रेमी कुटुंबीयांनी घरच्या घरी विविध प्रकारच्या रानभाज्यांच्या रेसिपी तयार करून हा रानभाज्या महोत्सव साजरा केला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन बाबा महाडिक, अलका मोहन जाधव, राणिता चौगुले, सुलभा मिरजकर, सई यादव, संगीता धामणस्कर, सुजाता पवार, ज्योतीराम पाटील या व इतर निसर्गप्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदवला. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर