रानभाज्या महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST2021-08-14T04:29:58+5:302021-08-14T04:29:58+5:30

रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून निसर्गाच्या कुशीत लपलेल्या आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रानभाज्यांची ओळख आज आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन ...

Vegetable Festival | रानभाज्या महोत्सव

रानभाज्या महोत्सव

रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून निसर्गाच्या कुशीत लपलेल्या आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रानभाज्यांची ओळख आज आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन शाहुवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी व्यक्त केले.

.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने संकल्प सिद्धी मंगल कार्यालय येळाणे ता. शाहूवाडी येथे आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सव उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान प्रारंभी तहसीलदार गुरू बिराजदार, सभापती विजय खोत गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवात मांडलेल्या रानभाजी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती. तर स्टॉलधारकांनी हे त्यांचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अभिजित धेडे, कृषी पर्यवेक्षक ए.बी. पाटील, एल.एन. चौगुले, एस.बी. काशिद, आर. बी. पाटील, सचिन कांबळे, शिवाजी काशिद यांच्यासह कृषी सहाय्यक आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Vegetable Festival