शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील, शाहू महाराज यांनी केली फेरनिवड

By विश्वास पाटील | Updated: October 25, 2023 15:13 IST

कोल्हापूर : पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. सोसायटीचे ...

कोल्हापूर : पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष शाहू महाराज यांनी सोसायटीच्या बैठकीत त्यांची ही निवड केली. या निवडीसाठी सोसायटीचे उपाध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे, संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी माजी आमदार मालोजीराजे यांचे सहकार्य व साथ लाभली असल्याचे सांगून सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचे व्ही.बी.पाटील यांनी आभार मानले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून पुणे या विद्येच्या माहेरघरात देशातील पहिली श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना करून सर्व समाजाच्या मुलांसाठी शैक्षणिक दालन उभे केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सुरू झालेल्या या सोसायटीचे सध्याचे शाहू महाराज यांनी इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आयटी., एमबीए अशा वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर केले आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात या संस्थेची वेगळी ओळख तयार झाली आहे.निवडीनंतर कृतज्ञता व्यक्त करताना व्ही.बी.पाटील म्हणाले, या संस्थेत गेली वीस वर्षे काम करत असताना शाहू महाराज यांनी पुन्हा एकदा गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष करून माझ्यावर विश्र्वास व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यात अधिक समरस होण्यास प्रोत्साहन व बळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. शाहू महाराज यांच्या माझ्यावरील विश्वासाचा अनुभव मला या संस्थेत काम करताना पदोपदी जाणवला आहे. त्या विश्वासास पात्र राहून सोसायटीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणे