वासनोली तलावाची दुरुस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST2021-07-29T04:24:29+5:302021-07-29T04:24:29+5:30

गारगोटी : वासनोली, ता. भुदरगड येथील तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून या तलावाच्या दुरुस्तीचा आराखडा सादर ...

Vasnoli lake will be repaired | वासनोली तलावाची दुरुस्ती होणार

वासनोली तलावाची दुरुस्ती होणार

गारगोटी : वासनोली, ता. भुदरगड येथील तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून या तलावाच्या दुरुस्तीचा आराखडा सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. वासनोली तलावाचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. तलावाच्या परिसरातील विहिरी व शेतजमिनींचीही मोठी हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार के. पी. पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर वासनोली तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला. यावर पवार यांनी तलावाच्या दुरुस्तीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तरतुदीबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान, के. पी. पाटील यांनी वासनोली तलावाला नुकतीच भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपअभियंता संतोष पाटील, भुदरगड शाखा अभियंता सिद्धार्थ आबिटकर, धनाजी पाटील, मधुकर पाटील उपास्थित होते.

फोटो ओळ

वासनोली येथे नुकसानीची पाहणी करताना के.पी. पाटील,केना पाटील,संतोष पाटील,सिद्धार्थ आबिटकर,प्रकाश डेळेकर आदी

Web Title: Vasnoli lake will be repaired