‘जीवन आशय’तर्फे वर्षा सारडा यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:49+5:302021-09-11T04:24:49+5:30
पुणे येथील संत सेवा संघामध्ये कार्यक्रम झाला. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. गीतांजली पाटील, ज्येष्ठ प्रवक्ते ...

‘जीवन आशय’तर्फे वर्षा सारडा यांचा सन्मान
पुणे येथील संत सेवा संघामध्ये कार्यक्रम झाला. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. गीतांजली पाटील, ज्येष्ठ प्रवक्ते दीपक भागवत, कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागातील डॉ. अभयकुमार बागडे, सृजन आनंद संस्थेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुजिता पडळकर, चेतना विकास मंदिरचे पवन खेबुडकर यांना ‘जीवन आशय’च्या अध्यक्षा शैला टोपकर आणि डॉ. शरद टोपकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, जास्वंदीचे रोप, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
दरम्यान, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्याचा उपक्रम ‘जीवन आशय’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या डॉ. सारडा यांनी अभाविप, संस्कारभारतीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. संस्कृत प्रचार-प्रसारासाठी त्यांनी कर्नाटकात काम केले आहे. शिक्षण, संशोधन, सामाजिक क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले असल्याचे शैला टोपकर यांनी सांगितले.
फोटो (१००९२०२१-कोल-जीवन आशय सत्कार) : पुणे येथे रविवारी शिक्षक दिनानिमित्त जीवन आशय बाल युवा केंद्र यासंस्थेच्या वतीने डॉ. वर्षा सारडा यांना डॉ. विद्या पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
080921\160808kol_7_08092021_5.jpg
फोटो (०८०९२०२१-कोल-जीवन आशय सत्कार) : पुणे येथे रविवारी शिक्षकदिनानिमित्त जीवन आशय बाल युवा केंद्र या संस्थेच्यावतीने डॉ. वर्षा सारडा यांना डॉ. विद्या पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.