मोदींच्या वाढदिनी भाजपतर्फे विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:55+5:302021-09-18T04:24:55+5:30

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने शुक्रवारी ‘स्वच्छता ...

Various activities by BJP on Modi's birthday | मोदींच्या वाढदिनी भाजपतर्फे विविध उपक्रम

मोदींच्या वाढदिनी भाजपतर्फे विविध उपक्रम

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने शुक्रवारी ‘स्वच्छता अभियान’आयोजित करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने २ आक्टोबरपर्यंत आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, अनाथाश्रम-वृद्धाश्रम याठिकाणी मदत, गरजू कुटुंबांना रेशन कीट वितरण, रक्तदान शिबिर यांसारख्या विविध उपक्रमांचे शहरातील सात मंडलांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याचदिवशी शुक्रवारी सकाळी शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने रंकाळा टॅावर परिसर (राजघाट) येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सुरुवातीला उपस्थित सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. यानंतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिसरात स्वच्छता करून कचरा, प्लास्टिक बाटल्या एकत्रित केल्या.

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी देशातील अनेक वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावले आहेत. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी ते आग्रही असतात. त्यांच्याकडून देशसेवेची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपणदेखील समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे.

यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे-पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, गिरीश साळोखे, अशोक लोहार, सचिन मुधाले, गौरव सातपुते, सचिन सुतार, प्राची कुलकर्णी, हर्शांक हरळीकर, कविता पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

१७०९२०२१ कोल बीजेपी ०१

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महानगर भाजपतर्फे शुक्रवारी सकाळी रंकाळा टॉवर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

Web Title: Various activities by BJP on Modi's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.