नागांतही आढळली विविधता

By Admin | Updated: August 1, 2014 00:54 IST2014-08-01T00:43:07+5:302014-08-01T00:54:59+5:30

सेनापती कापशीतील प्रकार : निसर्गमित्र संस्थेचे संशोधन

Variation found in Naganti also | नागांतही आढळली विविधता

नागांतही आढळली विविधता

आदित्य वेल्हाळ -कोल्हापूर - सेनापती कापशी (ता. कागल) येथे नागांच्या फण्यांवरील द्विवर्तुलांकित चिन्हावरील (दहाचा आकडा) विविधता असलेले वर्षभरात चार नाग आढळले आहेत. निसर्गमित्र संस्थेच्या संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे.
वर्षभरापूर्वी या गावातील स्थानिक सर्पमित्र बाळकृष्ण देसाई यांनी तेथे दोन नाग पकडले. या दोन नागांच्या फण्यांवरील चिन्हांत त्यांना फरक दिसला. लगेचच त्यांनी याबाबत निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले व किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला. वर्षभरात सेनापती कापशीत मिळालेल्या विविध नागांच्या फण्यांवरील चिन्हांची विविधता ही प्रत्येकवेळी वेगवेगळी दिसली. पहिल्या नागाच्या फण्यावरील चिन्हांत चार ठिपके दिसले. दुसऱ्या नागावर सहा
ठिपके, तिसऱ्या नागावर ठिपके जुळलेले आहेत. चौथ्या नागावर फण्यांवर असणाऱ्या चिन्हाप्रमाणे अजून एक चिन्ह त्या फण्याखाली दिसले.
भारतात नागाच्या फण्याच्या चिन्हांनुसार विविधता आढळते. त्यात ‘बायनोसिलेट’, ‘ब्लॅक’, ‘मोनोसिलेट’ असे तीन प्रकार
आहेत. सेनापती कापशीमध्ये आढळलेले नाग हे ‘बायनोसिलेट’ या प्रकारात मोडतात. प्रामुख्याने महाराष्ट्रात ‘बायनोसिलेट’ (फण्यावर दहाचा आकडा असलेला) नाग आढळतो. ही विविधता तेथील भौगोलिक वातावरण आणि त्यांच्या मिलनातून गुणसूत्रीय बदलानुसार घडत असल्याचे दिसून येते. निरीक्षणाने ‘बायनोसिलेट’ प्रकारात अजून निरीक्षकांना प्रांतानुसार नोंदी मिळत आहेत. संशोधनामध्ये निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचूळकर, अनिल वेल्हाळ, अनिल चौगुले, किशोर शिंदे या पथकाचा समावेश आहे.

संयुक्तपणे संशोधन
सेनापती कापशीतील वातावरण, भौगोलिक परिस्थितीचा नागांच्या गुणसूत्रीय बदलांवर होणारा परिणाम यावर झुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया व निसर्गमित्र संस्था एकत्रितरीत्या यापुढे संशोधन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संयुक्तपणे संशोधन
सेनापती कापशीतील वातावरण, भौगोलिक परिस्थितीचा नागांच्या गुणसूत्रीय बदलांवर होणारा परिणाम यावर झुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया व निसर्गमित्र संस्था एकत्रितरीत्या यापुढे संशोधन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नैसर्गिक बदल व वातावरणातील बदलांचा परिणाम सापांच्या रंगावर होतो तसेच त्यांच्या मिलनातून गुणसूत्रीय बदल घडतात व अंगावरील चिन्हांचे आकार बदललेले दिसतात.
-प्रा. किशोर शिंदे, सर्पतज्ज्ञ, कोल्हापूर

Web Title: Variation found in Naganti also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.