वरद प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST2021-08-24T04:29:46+5:302021-08-24T04:29:46+5:30
बोरवडे : सोनाळी ( ता. कागल ) येथील वरद रवींद्र पाटील या बालकाचा खून झाल्याची घटना क्रूर व ...

वरद प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा
बोरवडे : सोनाळी ( ता. कागल ) येथील वरद रवींद्र पाटील या बालकाचा खून झाल्याची घटना क्रूर व निंदनीय असून या घटनेचा तपास जलदगतीने करून आरोपी दत्तात्रय वैद्य याला कठोर शासन करावे, अशा मागणीचे निवेदन बिद्री ग्रामस्थांवतीने पोलिसांना देण्यात आले. मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांना हे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, पांडुरंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य आण्णासो पोवार, शहाजी गायकवाड, शहाजी पाटील, आप्पासो पाटील, पोलीस पाटील रमेश ढवण, दिगंबर पाटील, सुशांत चौगले, इंद्रजित पाटील, प्रकाश चौगले, हिंदुराव पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी - वरद पाटील खून प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा या मागणीचे निवेदन सपोनि विकास बडवे यांना देताना बिद्रीचे ग्रामस्थ.