वंदना जाधव यांच्या निवडीने राधानगरीत जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST2021-07-17T04:20:34+5:302021-07-17T04:20:34+5:30

तुरंबे : तळाशी (ता. राधानगरी) येथील ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव (गुरुजी) यांच्या स्नुषा वंदना जाधव यांची जिल्हा परिषदेच्या बांधकाम ...

Vandana Jadhav's election in Radhanagar | वंदना जाधव यांच्या निवडीने राधानगरीत जल्लोष

वंदना जाधव यांच्या निवडीने राधानगरीत जल्लोष

तुरंबे : तळाशी (ता. राधानगरी) येथील ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव (गुरुजी) यांच्या स्नुषा वंदना जाधव यांची जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत त्यांच्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची ग्वाही नूतन सभापती वंदना जाधव यांनी दिली.

कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातून विविध विकासकामांच्या माध्यमातून जाधव यांनी पती व पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव यांच्याद्वारे जनसामान्यांशी नाळ जोडली आहे. माजी सभापती वंदना जाधव यांची निवड होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके उडवून जल्लोष केला. तालुक्याला पद आणि कार्यकर्त्याला बळ देत आबिटकर यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. तळाशीसारख्या छोट्या गावातील कार्यकर्त्याला सन्मान देत आबिटकर यांनी शिवसैनिकांत चैतन्य आणले आहे.

वंदना जाधव यांनी निवड होताच येथील ग्रामदैवत गहिनीनाथाचे दर्शन घेतले. यानंतर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अशोकराव फराकटे, राजू वाडेकर, भाऊ पालकर, अशोक वारके, जयवंत खोत, विश्वनाथ पाटील, शामराव भावके, विजय बलुगडे, दादासो पाटील, बापूसाहेब किल्लेदार, अरविंद पाटील, भिकाजी हळदकर, सदाशिव चौगुले, युवराज पोवार, सातापा नरके, बाजीराव ढेरे, राजू चौगुले उपस्थित होते.

फोटो ओळी

जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल वंदना जाधव यांचा सत्कार आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, अरुण जाधव, अभिजित तायशेटे, वीरेंद्र मंडलिक, आदी उपस्थित होते.

Web Title: Vandana Jadhav's election in Radhanagar