मूल्य शिक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:24+5:302021-07-12T04:16:24+5:30
शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘एकविसाव्या शतकातील नैतिक मूल्ये’ या विषयारील कार्यशाळेत ‘मूल्य शिक्षण समाजाची सामूहिक जबाबदारी ...

मूल्य शिक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी
शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘एकविसाव्या शतकातील नैतिक मूल्ये’ या विषयारील कार्यशाळेत ‘मूल्य शिक्षण समाजाची सामूहिक जबाबदारी : एक चिंतन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण होते. उपाध्यक्ष डॉ. ऋतुजा पेडणेकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. हिंदूराव घरपणकर यांनी ‘उच्च शिक्षणातील नैतिक मूल्ये वास्तव आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, उच्च शिक्षणातील अनैतिकता संपवायची असेल तर शाळा, महाविद्यालयांना अभ्यासक्रमांमध्ये मूल्य शिक्षणाचे धडे असले पाहिजेत.
ऑनलाईन कार्यशाळेत कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश राज्यातील २६८ जणांनी भाग घेतला.
ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत केले. प्रा. गजानन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.