वैशाली चोरगे-सपकाळ यांना पीएचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:42+5:302021-02-09T04:26:42+5:30

कोल्हापूर : येथील वैशाली दशरथ चोरगे-सपकाळ यांना शिवाजी विद्यापीठाने इतिहास विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ‘सांगली जिल्ह्यातील ...

Vaishali Chorge-Sapkal holds a Ph.D. | वैशाली चोरगे-सपकाळ यांना पीएचडी

वैशाली चोरगे-सपकाळ यांना पीएचडी

कोल्हापूर : येथील वैशाली दशरथ चोरगे-सपकाळ यांना शिवाजी विद्यापीठाने इतिहास विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ‘सांगली जिल्ह्यातील शिक्षण प्रसारात रयत शिक्षण संस्थेचे योगदान’ या विषयावर विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. यासाठी त्यांनी ४९ माध्यमिक विद्यालये, तीन वरिष्ठ महाविद्यालये, दोन अध्यापक महाविद्यालये, दोन प्राथमिक शाळा, एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यास केला. या संशोधनासाठी त्यांना नवी दिल्लीतील आयसीएचआर या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या सध्या तासगाव येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विटा (जि. सांगली) हे त्यांचे मूळ गाव आहे. या संशोधनासाठी त्यांना डॉ. कविता गगराणी, नंदा पारेकर, अवनिश पाटील, रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राध्यापक महावीर मुळे, माधवराव मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो (०८०२२०२१-कोल-वैशाली चोरगे (पीएचडी)

Web Title: Vaishali Chorge-Sapkal holds a Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.