‘वैभवलक्ष्मी ब्लड बँके’चा परवाना कायमस्वरूपी रद्द
By Admin | Updated: June 11, 2014 01:15 IST2014-06-11T01:11:10+5:302014-06-11T01:15:25+5:30
‘अर्पण’ ब्लड बँकेचा पाच दिवसांसाठी परवाना निलंबित

‘वैभवलक्ष्मी ब्लड बँके’चा परवाना कायमस्वरूपी रद्द
कोल्हापूर : रक्तपेढ्यांमधील रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, साहित्यांचे सुसूत्रीकरण नसणे, सोयी-सुविधांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, रक्तांच्या बाटल्यांवर लेबल नसणे, आदी त्रुटी आढळल्याने कोल्हापुरातील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचा कायमस्वरूपी परवाना रद्द केला, तर लक्ष्मीपुरीतील ‘अर्पण’ ब्लड बँकेचा पाच दिवसांसाठी परवाना निलंबित केला. ही कारवाई पुणे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बाळासाहेब मासळ यांनी केली.
‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी पुण्यासह कोल्हापूर शहरातील रक्तपेढ्यांच्या केलेल्या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्याने सहा रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले. तर बागल चौक परिसरातील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांचा कायमचा परवाना रद्द करण्यात आला. कोल्हापुरातील या ब्लड बँकेमध्ये त्रुटी आढळून आल्याचा अहवाल पुणे सहआयुक्तांकडे पाठविला होता. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे कोल्हापूर विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ए. एम. खडतरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)