आजपुरता लस साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:51+5:302021-04-16T04:25:51+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील २३८ पैकी १५४ केंद्रांवर गुरुवारी १५६०६ पहिले कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आले. मात्र अजूनही डोस ...

आजपुरता लस साठा उपलब्ध
कोल्हापूर : जिल्ह्यातील २३८ पैकी १५४ केंद्रांवर गुरुवारी १५६०६ पहिले कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आले. मात्र अजूनही डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसून शुक्रवारच्या लसीकरणापुरते २४ हजार डोस रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यातील ८४ लसीकरण केंद्रांवर गुरुवारी लसीकरण झाले नाही. १५ हजार ६०६ नागरिकांनी पहिला, तर २३३१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला.
चौकट
गुरुवारचे लसीकरण...
विभाग पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १०० १३४
फ्रंटलाईन वर्कर्स ५०६ २१९
४५ वर्षांवरील नागरिक १०४२८ ५१४
६० वर्षांवरील ४५७२ १४६४
एकूण दिवसभरातील १७ हजार ९३७
चौकट
एकूण पहिला डाेस घेतलेले नागरिक : ६ लाख ४७ हजार ३४०
दुसरा डोस घेतलेले नागरिक : ४४ हजार ३८९