फुलेवाडी आरोग्य केंद्रावर साडेसात हजार जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:08+5:302021-05-07T04:24:08+5:30

फुलेवाडी : उपनगरासह ग्रामीण भागातील लोकांसाठी कोरोनावरील लसीकरणात आधार बनलेल्या फुलेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आजअखेर कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन ...

Vaccination of seven and a half thousand people at Phulewadi Health Center | फुलेवाडी आरोग्य केंद्रावर साडेसात हजार जणांचे लसीकरण

फुलेवाडी आरोग्य केंद्रावर साडेसात हजार जणांचे लसीकरण

फुलेवाडी : उपनगरासह ग्रामीण भागातील लोकांसाठी कोरोनावरील लसीकरणात आधार बनलेल्या फुलेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आजअखेर कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे तब्बल ७,६०० डोस देण्यात आले आहेत. येथे कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देणे सुरू असून, गुरुवारी ३२० नागरिकांना लस देण्यात आली. सध्या या केंद्रावर पहिला डोस उपलब्ध नसल्याने अनेकांना पहिल्या डोसची प्रतीक्षा लागली आहे. फुलेवाडी केंद्रात १५ मार्चपासून कोव्हिशिल्डचा पहिला व दुसरा डोस मिळून ६,९७० इतके लसीकरण पूर्ण झाले तर कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा मिळून ६५० डोस देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील नाळे, परिचारिका नंदिनी पाटील यांच्यासह कर्मचारी डोस देण्याचे नियोजन करतात. फुलेवाडी नागरी केंद्रावर २९ एप्रिलपासून पहिला डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले. सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांनाच उपलब्ध डोसनुसार येथे दुसरा डोस दिला जात आहे.

चौकट

१८ ते ४४ वयोगटासाठीही हवी लस

उपनगरासह ग्रामीण भागातील लोकांची गरज लक्षात घेऊन फुलेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरु होण्याची आवश्यकता आहे. सध्या शहरामध्ये विक्रमनगर येथेच या वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. येथे दररोज फक्त २०० जणांनाच लस दिली जात आहे.

Web Title: Vaccination of seven and a half thousand people at Phulewadi Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.