महापालिका हद्दीत एक लाख २३ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:35+5:302021-06-17T04:17:35+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत शहरात एक लाख २३ हजार ७२३ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ४४ हजार ७७ नागरिकांना ...

Vaccination of one lakh 23 thousand citizens within the municipal limits | महापालिका हद्दीत एक लाख २३ हजार नागरिकांचे लसीकरण

महापालिका हद्दीत एक लाख २३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत शहरात एक लाख २३ हजार ७२३ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ४४ हजार ७७ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. सध्या राज्य सरकारकडून लस कमी उपलब्ध होत असल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

शहरात बुधवारी नऊ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये ६० वर्षांवरील २३६ नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर ३७८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. पहिला व दुसरा डोस मिळून ६१४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १०, फिरंगाई ५५, राजारामपुरी १००, पंचगंगा ७३, महाडीक माळ ४२, आयसोलेशन ५३, फुलेवाडी ५७, सदरबाजार ५०, मोरे मानेनगर ९९ व सीपीआर हॉस्पिटल येथे ७५ नागरिकांचे लसीकरण झाले.

कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुस-या डोस घेण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावे. तसेच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुस-या डोसकरीता सावित्रीबाई फुले????? येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of one lakh 23 thousand citizens within the municipal limits