आजरा ग्रामीण रुग्णालयात कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:52+5:302021-02-05T07:07:52+5:30

लसीकरणाचा शुभारंभ आरोग्य सहायक जे. एच. साबखान, अंगणवाडी सेविका जयश्री तानवडे (देवर्डे), अनिता कांबळे (बुरूडे) यांना लस देऊन करण्यात ...

Vaccination of Kovid warriors begins at Ajra Rural Hospital | आजरा ग्रामीण रुग्णालयात कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात

आजरा ग्रामीण रुग्णालयात कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात

लसीकरणाचा शुभारंभ आरोग्य सहायक जे. एच. साबखान, अंगणवाडी सेविका जयश्री तानवडे (देवर्डे), अनिता कांबळे (बुरूडे) यांना लस देऊन करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयातील छाया वाजंत्री व आसावरी गायकवाड यांनी कोरोनाची लस दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्णांडिस, डॉ. वृषाली केळकर यासह स्टाफने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोरोना महामारीत अग्रभागी राहून काम करणा-या कोविड योद्ध्यांना अग्रक्रमाने आज लस देण्यात आली. यावेळी लस देण्यात येणा-या कर्मचा-यांचे तापमान, ऑक्सिजन, शुगर व ब्लड प्रेशर तपासून त्यांनाही प्रबोधन करण्यात आले. आज १०२ जणांना लसीकरण करण्यात आले.

यावेळी सभापती उदय पवार, उपसभापती वर्षा बागडी, सदस्या रचना होलम, जि. प. सदस्य जयवंत शिंपी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका संजीवनी सावंत, शुभदा जोशी, शकुंतला सलामवाडे, तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, आरोग्य पर्यवेक्षक सुमन मोहिते, विनायक काटकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

--------------------------

* आज-यासाठी २,२८० कोरोना लसीचे डोस

आजरा तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे ९५७ जण कोरोना रुग्ण असून, त्यापैकी ९०५ जण बरे झाले आहेत. कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू झाला तर सध्या ९ जण उपचार घेत आहेत. तालुक्यातील सर्वांसाठी २,२८० कोरोना लसीचे डोस आले आहेत.

---------------------------

फोटो ओळी : आजरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस आरोग्य सहायक जे. एच. साबखान यांना देताना. शेजारी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी व अन्य.

क्रमांक : २५०१२०२१-गड-०१

Web Title: Vaccination of Kovid warriors begins at Ajra Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.