तरुण मंडळांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सर्वांसाठी दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:09+5:302021-09-14T04:28:09+5:30
इंगळी : तरुण मंडळांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्याचा उपक्रम जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. त्यांचे हे कार्य निश्चित सर्वांसाठी दिशादर्शक ...

तरुण मंडळांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सर्वांसाठी दिशादर्शक
इंगळी : तरुण मंडळांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्याचा उपक्रम जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. त्यांचे हे कार्य निश्चित सर्वांसाठी दिशादर्शक असून, अन्य गावांतील मंडळांनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी केले.
येथील एस. एम. डी. कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र पट्टणकोडोलीच्यावतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार, सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, दिग्विजय खोत, सरपंच शालन पाटील, रावसाहेब पाटील, डॉ. काकासाहेब पाटील, डॉ. नंदकुमार भोसले, संदीप भातमारे उपस्थित होते. फोटो ओळी
१३०९२०२१-आयसीएच-०२
इंगळी (ता. हातकणंगले) येथे लसीकरण शिबिराचे उद्घाटन डॉ. उत्तम मदने यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी डॉ. प्रसाद दातार, डॉ. नंदकुमार भोसले, पंकज गिरी, विठ्ठल गाताडे, आदी उपस्थित होते.