शिये गटात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:42 IST2021-03-13T04:42:33+5:302021-03-13T04:42:33+5:30

शिये : शिये जिल्हा परिषद मतदारसंघात कोविड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणार असून नागरिकांनी लसीबाबत गैरसमज करून ...

Vaccination campaign in Shia group will be implemented effectively | शिये गटात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणार

शिये गटात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणार

शिये : शिये जिल्हा परिषद मतदारसंघात कोविड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणार असून नागरिकांनी लसीबाबत गैरसमज करून न घेता लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांनी केले.

भूये (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक कोवीशिल्ड लस देण्याचा प्रारंभ जि.प. सदस्या मनीषा कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते. भुये प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील ६० वर्षावरील नागरिक व इतर व्याधी असणारे ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली असल्याचे डॉ. शोभा सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी सादळे मादळेचे सरपंच मीनाक्षी जाधव, भुये उपसरपंच सुरेखा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ शोभा सूर्यवंशी, औषध निर्माण अधिकारी सोनवणे, डॉ राजदीप, सतीश कुरणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो : ११ शिये लसीकरण माेहीम

भुये येथे कोविशिल्ड लस देण्यास प्रारंभ करताना जि.प. सदस्या मनीषा कुरणे, डॉ. शोभा सूर्यवंशी, बाजीराव पाटील, सतीश कुरणे आदी

Web Title: Vaccination campaign in Shia group will be implemented effectively