‘ब्रुसेला’ रोगामुळे जनावरांना लसीकरण

By Admin | Updated: July 18, 2014 23:25 IST2014-07-18T23:17:32+5:302014-07-18T23:25:53+5:30

खबरदारीचा उपाय सुरु

Vaccination of animals due to 'Brucea' disease | ‘ब्रुसेला’ रोगामुळे जनावरांना लसीकरण

‘ब्रुसेला’ रोगामुळे जनावरांना लसीकरण

उचगाव : उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील जनावरांना ‘ब्रुसेला’ रोगाची लागण रोखण्याकरिता लसीकरणास सुरुवात झाली आहे. गाई-म्हशी व्याल्यानंतर त्यांच्यापासून जंतूसंसर्ग व जनावरांना ताप, लाळ गाळणे, अशक्तपणा जाणवत आहे. काही जनावरे चारा खात नाहीत. यामुळे गाई-म्हशी, रेडकं, वासरू, बैल यांचे लसीकरण सुरू झाले आहे.
पशुधन वाचविण्यासाठी पशुवैद्यक प्रयत्न करीत आहेत. ज्या जनावरांना लसीकरण झाले आहे, त्यांची काळजी घेताना इंजेक्शन केलेल्या भागाला शेतकऱ्यांनी हात लावू नये, जनावरांच्या गोठ्यात जाताना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून डोळ्यावर गॉगल घालावा. तसेच जंतूसंसर्ग रोखण्यासाठी गोठ्याची स्वच्छता करावी. गाभ व प्रसूतीजन्य जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले.
रोगामुळे जंतूसंसर्ग झाला असेल, तर हातांना ग्लोज वापरावे, अथवा प्लास्टिकची पिशवी हाताला घालून शेण व मलमूत्र काढावे. यामुळे स्वत:ला या रोगाची लागण होणार नाही. लाखमोलाच्या जनावरांना वाचविण्यासाठी शेतकरी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे हेलपाटे मारीत आहेत, तर दूध संघातर्फे गावातच लसीकरण शिबिर घेतले जात आहे.

Web Title: Vaccination of animals due to 'Brucea' disease