शहरातील ९७२ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:37+5:302021-07-04T04:17:37+5:30
कोल्हापूर : शहरातील ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालयात शनिवारी ६० वर्षांवरील ९७२ जणांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ...

शहरातील ९७२ जणांचे लसीकरण
कोल्हापूर : शहरातील ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालयात शनिवारी ६० वर्षांवरील ९७२ जणांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ७८, राजारामपुरीत १३३, पंचगंगा रुग्णालयात ५८, महाडिक माळ येथे ४०, सदर बाजार येथे २०, फिरंगाईत ९२, सिद्धार्थ नगरात २०, कसबा बावडा येथे ३७, फुलेवाडीत ६९, आयसोलेशनमध्ये १०८, मोरे मानेनगरमध्ये ११२, सीपीआर रुग्णालयात २०० जणांना लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर एकूण १ लाख २६ हजार ३८२ जणांना पहिला डोस तर, ५१ हजार २९२ जणांना दुसरा डोस देण्यात आला.
आज, रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६० वर्षांवरील नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेण्यासाठी महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर उपस्थित रहावे, तसेच ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत, अशा ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.