शहरात ५०६ नागरिकांचे लसीकरण, आजही फक्त कोवॅक्सिनचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST2021-05-17T04:23:32+5:302021-05-17T04:23:32+5:30
कोल्हापूर : कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरातील लसीकरण थांबविण्यात आले आहे. आज, सोमवारीही लसीकरण बंद ठेवावे ...

शहरात ५०६ नागरिकांचे लसीकरण, आजही फक्त कोवॅक्सिनचा दुसरा डोस
कोल्हापूर : कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरातील लसीकरण थांबविण्यात आले आहे. आज, सोमवारीही लसीकरण बंद ठेवावे लागणार आहेत. रविवारी ५०६ नागरिकांना फक्त कोवॅक्सिन लस देण्यात आली.
रविवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे १३३, फिरंगाई येथे १२, राजारामपुरी येथे ५५, पंचगंगा येथे ६६, कसबा बावडा येथे ५५, महाडिक माळ येथे ३६, आयसोलेशन येथे ३५, फुलेवाडी येथे ९, सदर बाजार येथे ६६, सिद्धार्थनगर येथे २० व मोरे-मानेनगर येथे २० इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरात आतापर्यंत एक लाख १२ हजार ९४८ नागरिकांचे पहिल्या डोसचे, तर ३९ हजार ७०३ नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
आजही कोवॅक्सिनचा दुसरा डोसच
कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आज, सोमवारी महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्षे ४५ वरील कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसकरिता महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.