शहरात २९७ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:28+5:302021-05-24T04:23:28+5:30

कोल्हापूर : शहरात रविवारी सात प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात मिळून एकूण २९७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक ...

Vaccination of 297 citizens in the city | शहरात २९७ नागरिकांचे लसीकरण

शहरात २९७ नागरिकांचे लसीकरण

कोल्हापूर : शहरात रविवारी सात प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात मिळून एकूण २९७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ५०, फिरंगाई येथे ७४, राजारामपूरी येथे १२, पंचगंगा येथे २७, महाडिक माळ येथे ५४, सदरबाजार येथे ४१ व सिध्दार्थनगर येथे ३९ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत एक लाख १३ हजार१३० नागरीकांना पहिल्या डोसचे तर ४० हजार ३२१ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

आज सोमवारी ४५ वर्षावरील कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोस घेण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रावरुन फोन येईल त्यांनीच व ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनीच लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of 297 citizens in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.