शहरात १५८५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:53+5:302021-06-23T04:16:53+5:30
कोल्हापूर : शहरात मंगळवारी दिवसभर १० प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआरमध्ये ६० वर्षांवरील ४३७ नागरिकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा ...

शहरात १५८५ नागरिकांचे लसीकरण
कोल्हापूर : शहरात मंगळवारी दिवसभर १० प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआरमध्ये ६० वर्षांवरील ४३७ नागरिकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर ११४८ जणांना दुसरा डोस देण्यात आला. शहरात पहिला, दुसरा डोस असे एकूण १५८५ जणांचे लसीकरण करण्यात आले.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १२०, फिरंगाई येथे १०७, राजारामपुरी येथे १०४, पंचगंगा येथे ६६, कसबा बावडा येथे १०१, महाडीक माळ येथे ६०, आयसोलेशन येथे २०१, फुलेवाडी येथे ११०, सदरबाजार येथे ९९, मोरे मानेनगर येथे ४१२ आणि सीपीआर हॉस्पिटल येथे २०५ जणांना लसीकरण करण्यात आले. शहरात आजअखेर १ लाख २४ हजार ६८० जणांना पहिल्या डोसचे, तर ४६ हजार ४९३ जणांना दुसरा डोस देण्यात आला.