शहरातील ५ हजार ३९ जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST2021-08-25T04:29:38+5:302021-08-25T04:29:38+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात मंगळवारी कोविशिल्डचे ५ हजार ३९ जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ ...

शहरातील ५ हजार ३९ जणांना लस
कोल्हापूर : महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात मंगळवारी कोविशिल्डचे ५ हजार ३९ जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर ३९ व १८ ते ४५ वर्षापर्यंतच्या ३ हजार ५८८ जणांना लसीकरण करण्यात आले. ४५ ते ६० वर्षापर्यंत १०२२ जणांना, ६० वर्षांवरील ३९० जणांचे लसीकरण करण्यात आले.
आज, बुधवारी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांनी पहिल्या डोससाठी लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केले आहे त्यांनीच महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.