शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Kolhapur : १८ वर्षांवरील ४२०० जणांना रोज लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 20:18 IST

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर  जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटांतील रोज ४ हजार २०० जणांना शुक्रवार (दि. ६) ऑगस्टपासून रोज लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना जाधव यांनी ही माहिती दिली. यासाठी जिल्ह्यातील २१ आरोग्य संस्थांमध्ये सोय करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१८ वर्षांवरील ४२०० जणांना रोज लसजिल्ह्यात २१ ठिकाणी सोय; उद्यापासून सुरुवात

कोल्हापूर  : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटांतील रोज ४ हजार २०० जणांना शुक्रवार (दि. ६) ऑगस्टपासून रोज लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना जाधव यांनी ही माहिती दिली. यासाठी जिल्ह्यातील २१ आरोग्य संस्थांमध्ये सोय करण्यात आली आहे.सध्या जिल्ह्यातील १८ लाख ४१ हजार २०४ नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक, आरोग्य कर्मचारी, कोरोना काळात पुढाकार घेऊन काम करणारे कर्मचारी यांचा यामध्ये समावेश आहे. १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु, मुबलक प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने पहिला डोस केवळ ४ टक्के आणि दुसरा डोस केवळ १९ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. ४५ ते ५९ या वयोगटांमध्ये राज्यात सर्वाधिक लसीकरण हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे.आता दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असले तरी दुसऱ्या बाजूला १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २१ आरोग्यसंस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. रोज प्रत्येक ठिकाणी २०० याप्रमाणे ४२०० नागरिकांना लसीकरण केले जाईल. दुसऱ्या डोससाठी नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अजूनही संपलेला नाही. तेव्हा वेळेत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.या ठिकाणी होईल लसीकरणग्रामीण रुग्णालय आजरा, भुदरगड, चंदगड, नेसरी, हातकणंगले, पारगाव, कागल, मुरगूड, खुपिरे, मलकापूर, शिरोळ, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, गांधीनगर, कोडोली, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे, तारळे, कळे, वाळवा, भेडसगाव, जयसिंगपूर आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लालनगर इचलकरंजीसंध्याकाळी चार वाजता नोंदणीसाठी स्लॉट खुला केला जाईल. त्यावेळी कोविन पोर्टल किंवा आरोग्यसेतू ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्रावर ९ ते ५ या वेळेत २०० जणांना लस दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी न केलेल्यांना लस दिली जाणार नसल्याने केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.दुसऱ्या डोससाठी अडीच लाख नागरिक पात्रपहिला डोस घेतल्यानंतर आता दुसऱ्या डोससाठी अडीच लाख नागरिक पात्र आहेत. त्यामुळे प्राधान्याने दुसऱ्या डोस आवश्यक असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या लस पुरेशा प्रमाणात येत असून, नागरिकांनी मोबाईलवर आलेल्या संदेशानुसार त्या त्या ठिकाणी जाऊन आपला डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर