शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

डाळिंबाच्या बागेत उषातार्इंचा ट्रॅक्टर

By admin | Updated: March 7, 2017 23:01 IST

ढवळ : शेतीच्या मशागतीचीही अवजड कामेही करताना पुढाकार

लखन नाळे -- वाठार निंबाळकर  -चार हजार लोकसंख्येच्या गावचा गाडा चालवितानाच उत्तम पद्धतीची डाळिंब पिकाची शेती करणाऱ्या उषाताई आप्पासो लोखंडे नुसत्या ढवळ गावातच नव्हे तर फलटण तालुक्यात इतर महिलांपुढे आदर्श ठरत आहेत. ढवळ, ता. फलटण गावच्या सरपंच उषाताई लोखंडे या ढवळ या चार हजार लोकसंख्येच्या गावचा गावगाडा उत्तमपणे हातळत असून, गावातील सार्वजनिक व वैयक्तिक कामांमध्ये सक्रिय सहभागी असतात. गावच्या कामकाजाबरोबरच घरातील दोन मुले, नोकरदार पती, वृद्ध सासूबाई आदींची कौटुंबिक जबाबदारीही त्या उत्तमपणे सांभाळत आहेत.थोरा-मोठ्यांच्या सरपंच आन्टी या फक्त ‘चूल आणि मूल’ यामध्ये न अडकता पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक व राजकीय जीवन जगत असून, डॅशिंग व धडाडीच्या आन्टी गावात अन्याय, अत्याचार कधीही होऊ देत नाहीत.ही झाली एक बाजू, त्यांच्या स्वत:च्या कुटुंबासाठी काम करताना त्या खरोखरच आदर्श ठरत असून, सर्व प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहन चालवितानाच शेतात ट्रॅक्टरने नांगरट व इतर शेतीची मशागत त्या स्वत: ट्रॅक्टर चालवून करताना पाहताना पुरुषांनाही लाज वाटेल, अशा पद्धतीचे काम शेतात करीत असतात. तीन वर्षांपूर्वी शेततळे तयार करून त्यामध्ये पाणी साठवणूक केली व ढवळच्या माळावर आन्टी यांनी सहा एकर डाळिंबाची लागवड कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली.स्वत: घेत असलेले कष्ट व करीत असलेल्या मेहनतीच्या जोरावर आज त्यांनी डाळिंब पीक उत्तम पद्धतीने आणले असून, डाळिंब पिकावर वेळच्या वेळी औषध फवारणी, पाणी, खते पिकाला देऊन डाळिंब पीक मोठ्या जोमात डोलायला लावले आहे. या शेती व्यवसायाबरोबरच गायी सांभाळून दुग्ध व्यवसाय व दूध शीतकरण केंद्र ही त्या उत्तम पद्धतीने चालवित आहेत. त्यांचे पती आप्पासाहेब हे माध्यमिक विद्यालयात कर्मचारी म्हणून काम करत असून, पतीच्या मदतीशिवाय शेती व्यवसाय व राजकारण उत्तम पद्धतीने ढवळ गाव फलटण तालुक्यातील महिलांपुढे वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम सरपंच उषाताई लोखंडे यांनी केले आहे.