मोबाईलचा वापर जपून करा : बालाजी भांगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:12+5:302021-09-14T04:28:12+5:30
दत्तवाड : पोलीस कायद्याने काम करतात, मात्र जनतेच्या सहकार्याशिवाय हे काम शक्य नाही. सध्या गुन्हेगारीची पद्धत बदलत आहे. आयटी ...

मोबाईलचा वापर जपून करा : बालाजी भांगे
दत्तवाड : पोलीस कायद्याने काम करतात, मात्र जनतेच्या सहकार्याशिवाय हे काम शक्य नाही. सध्या गुन्हेगारीची पद्धत बदलत आहे. आयटी क्षेत्रातील होणारी गुन्हेगारी ही भयानक असून, यापासून सर्वांनी दूर राहावे. मोबाईल हा ज्ञानार्जनासाठी आहे. याचा विद्यार्थ्यांनी जपून वापर करावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले. दत्तवाड ग्रामपंचायतीच्यावतीने दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी विनायक माने होते. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, बबनराव चौगुले, रवींद्र पाटील, आण्णासोा सिदनाळे, डी. एन. सिदनाळे, तलाठी अश्विनी खराडे, नेहा पाटील, उपसरपंच नाना नेजे, तंटामुक्त अध्यक्ष बाळासोा कोकणे, बाबूराव पवार, नूर काले, दौलत माने, आण्णाप्पा कांबळे उपस्थित होते.
फोटो - १३०९२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - दत्तवाड (ता. शिरोळ) येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केला. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, नाना नेजे, विनायक माने, रवींद्र पाटील उपस्थित होते.