सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा : दराडे

By Admin | Updated: February 27, 2015 00:19 IST2015-02-27T00:01:42+5:302015-02-27T00:19:14+5:30

‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण

Use helmet for safety: Darade | सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा : दराडे

सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा : दराडे

कोल्हापूर : वाहन चालवतांना हेल्मेट, सिटबेल्ट वापरल्यास अपघातात इजा होण्याचे प्रमाण ८५ टक्के कमी असते. त्यामुळे कायदा म्हणून नव्हे, तर आपल्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, सिटबेल्टचा वापर करा, असे आवाहन कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी गुरुवारी केले. शिरोली एमआयडीसी कार्यालय येथे ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दराडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष भोगशेट्टी उपस्थिती होते. यावेळी दराडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण झाले.
दराडे म्हणाले, आपण बऱ्याच वेळा परदेशातील आणि भारतातील सुविधा यांच्यात तुलना करतो. मात्र, परदेशात नियम काटेकोरपणे पाळले जातात. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. आपणही शिस्त म्हणूून नियम पाळले पाहिजेत. कायदा असला तरी आपल्या सुरक्षेसाठी स्वयंशिस्त पाळून हेल्मेट, सिटबेल्ट वापरायला पाहिजे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १९८५ साली ५७ हजार वाहने होती. २0१५ च्या सुरुवातीला ही संख्या नऊ लाख ७७ हजार झाली. दर महिन्याला यात सरासरी दहा हजार वाहनांची भर पडत आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येने अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट, सिटबेल्ट वापरणे आवश्यक आहे. वाहन चालवताना नियमांचे पालन केल्याने २0१३ च्या तुलनेत यावर्षी अपघातातील मृतांचे प्रमाण काही अंशी घटल्याचेही त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा सप्ताह जानेवारीपुरताच साजरा न करता येत्या मार्चपासून प्रत्येक तालुक्यात नियमांसंबंधी जागृती करणार असून ‘लोकमत’ने त्याला पाठबळ द्यावे, असे आवाहनही दराडे यांनी केले. सरव्यवस्थापक मकरंद देशमुख म्हणाले, ‘लोकमत’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापराचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सक्ती, कायदा म्हणून नव्हे, तर आपल्या घरी कोणीतरी वाट पाहत आहे याचे भान ठेवून हेल्मेट वापरायला हवे. संपादक वसंत भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी यांनी प्रस्ताविक केल.

Web Title: Use helmet for safety: Darade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.