शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बिगर शेती आदेशासाठी बनावट सही शिक्कांचा केला वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:25 IST

जमिनीच्या व्यवहारासाठी तहसिलदारांची बनावट सही व शिक्‍क्‍यांचा वापर करुन त्या आधारे अकृषिक बिगर आकारणी निश्‍चितीचा खोटा आदेश तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडिकस आला.

ठळक मुद्देबिगर शेती आदेशासाठी बनावट सही शिक्कांचा केला वापर पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील प्रकार; तिघे अटक ; एकूण चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : जमिनीच्या व्यवहारासाठी तहसिलदारांची बनावट सही व शिक्‍क्‍यांचा वापर करुन त्या आधारे अकृषिक बिगर आकारणी निश्‍चितीचा खोटा आदेश तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडिकस आला.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चौघा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली. मंडल अधिकारी नामदेव जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.अटक केलेल्या संशयितांची नावे : सुनील कृष्णात खांडेकर (रा. बालिंगा), कृष्णा दादू खोत (रा. कणेरीवाडी, करवीर), शैलेश चंदरशेखर जाधव (रा. सासने कॉलनी). तर गजानन रवींद्र पाटील (रा. कणेरी, करवीर) यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पण चौघांवरही गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मौजे पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील जमीनीचा व्यवहारासाठी संशयित सुनील खांडेकर, कृष्णा खोत, शैलेश जाधव व गजानन पाटील या चौघांनी खरेदीपूर्व संचकारपत्र तयार केले. त्यानंतर त्यांनी दि. १५ फेब्रुवारी ते दि.२३ मार्च २०२० या कालावधीत तहसिलदारांच्या खोट्या सह्या व शिक्‍क्‍यांचा वापर करून अकृषिक बिगर आकारणी निश्‍चितीचा (बिगर शेती)चा बनावट आदेश तयार केला.

अशा प्रकारे शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार तहसिलदारांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने संबधितांवर कारवाईचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार अधिकारी जाधव यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार चौघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. रात्री उशीरा संशयित आरोपी खांडेकर, जाधव व खोत या तिघांना अटक केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस