बांधावरील युरिया खत वाटप योजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:42+5:302021-07-03T04:16:42+5:30
बांबवडे : साळशी (ता. शाहूवाडी) येथे महाराष्ट्र शासनाच्या बांधावर खत वाटप योजनेची ...

बांधावरील युरिया खत वाटप योजना सुरू
बांबवडे : साळशी (ता. शाहूवाडी) येथे महाराष्ट्र शासनाच्या बांधावर खत वाटप योजनेची सुरुवात जि. प. सदस्य विजय बोरगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना युरियाचे वाटप करण्यात आले.
या एरियाचे वाटप साळशीसह भोसलेवाडी, पवारवाडी, सोनवडे, परखंदळे इत्यादी शेतकऱ्यांना करण्यात आले. त्यांना १२ टन युरियाचे वाटप कृषी विभागामार्फत करण्यात आले.
यावेळी कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर, तालुका कृषी अधिकारी अभिजित धेंडे, माजी शिक्षण व अर्थ सभापती महादेवराव पाटील, माजी उपसभापती महादेवराव पाटील, सरपंच संदीप पाटील, पद्मसिंह पाटील, आनंदा पाटील, अमर पाटील, संदीप पाटील पिशवीकर, ग्रामपंचायत सदस्य इत्यादी उपस्थित होते.