शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:15 IST

लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाले.

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्लीचे सुपुत्र स्वप्निल तुकाराम माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे.

सोमवारी दुपारी निकाल जाहीर झाला. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. स्वप्निल यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक क. विद्यामंदिर भाग शाळा नदीकिनारा येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण सिद्धनेर्ली विद्यालय येथे झाले. इयत्ता दहावीमध्ये ८४ टक्के मिळवूनही परिस्थितीमुळे त्यांना आयसीआरई (ICRE) गारगोटी येथे यांत्रिक अभियांत्रिकी मेकॅनिकल डिप्लोमासाठी प्रवेश घ्यावा लागला.

लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. भरपूर अभ्यास करून डिप्लोमामध्ये ८७ टक्के गुण मिळविले. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (VIT), पुणे या शिक्षण संस्थेत बी.ई. मेकॅनिकलसाठी प्रवेश मिळवला. त्यामध्ये १० पैकी ९.३ क्रेडिट मिळवून २०१८ मध्ये तेथेही अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर पुणे येथे पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.पहिल्या दोन प्रयत्नांत पूर्व परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा न तयारी चालू ठेवली. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाल्याने काही काळ गावी परतावे लागले. कोरोना काळात गावी राहून पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून दोन्ही परीक्षेत पात्र होऊन मे २०२१ मध्ये मुलाखत झाली.

विशेष म्हणजे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून होऊनही स्वप्निल माने यांनी यूपीएससी परीक्षेसाठी पेपर लिहिण्यासाठी तसेच मुलाखतीसाठी माध्यम म्हणून इंग्रजी भाषेची निवड केली होती.

आजी-आजोबांमुळे गरुडझेप

स्वप्निल चौथीमध्ये असताना आईचा व २०१८ मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याने खचून न जाता हे यश प्राप्त केले. आजोबा दत्तात्रय यांनी चिकनच्या दुकानात काम करून, तर आजी सुशिला यांनी शेतात काम करत स्वप्निल यांच्या पंखाना बळ दिल्यानेच गरुडझेप घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा