‘सीपीआर’मध्ये अद्ययावत एक्सरे मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:16+5:302021-01-03T04:26:16+5:30
कोल्हापूर : सीपीआरमध्ये क्ष-किरण विभागाच्या वतीने नवीन अद्ययावत ५०० एमए डिजिटल एक्सरे मशीन बसवण्यात आले ...

‘सीपीआर’मध्ये अद्ययावत एक्सरे मशीन
कोल्हापूर : सीपीआरमध्ये क्ष-किरण विभागाच्या वतीने नवीन अद्ययावत ५०० एमए डिजिटल एक्सरे मशीन बसवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार सेवा मिळणार आहे. तसेच ते पाठीमागील बाजूस बसवण्यात आल्याने आंतररुग्णांना इमारतीला वळसा घालून जावे लागणार नाही.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार १५० जागा असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहा एक्सरे मशीन आवश्यक आहेत. मात्र राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या केवळ तीन मशीन्स आहेत. आता हे चौथे मशीन बसविण्यात आले आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये आणि या विभागाचे प्रमुख डॉ. स्वेनील शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे ३० लाख रुपयांचे मशीन मंजूर झाले आणि विद्यमान अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ते केवळ दोन आठवड्यांत बसविण्यातही आले.
या मशीनचे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.