अद्यावत इमारत साकारणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:11+5:302021-08-21T04:27:11+5:30
जयसिंगपूर : शहराच्या वैभवात भर घालणारी नगरपालिकेची नवीन वास्तू अद्यावत असणार आहे. या इमारतीकरिता दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त ...

अद्यावत इमारत साकारणार : राजेंद्र पाटील-यड्रावकर
जयसिंगपूर : शहराच्या वैभवात भर घालणारी नगरपालिकेची नवीन वास्तू अद्यावत असणार आहे. या इमारतीकरिता दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, तर आणखी सात कोटी रुपये मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम लवकरच सुरू करू, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
येथील नगरपालिकेच्या नवीन इमारतीचा पायाखुदाई राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. नीता माने होत्या. यावेळी कोनशिलाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. नगरपालिकेची नवीन वास्तू ही अद्यावत व सर्व सुविधायुक्त असणार आहे. स्वागत व प्रास्ताविक उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी टिना गवळी, नगरसेवक संभाजी मोरे, शीतल गतारे, अर्जुन देशमुख, राहुल बंडगर, बजरंग खामकर, पराग पाटील, दादा पाटील-चिंचवाडकर, संगीता पाटील-कोथळीकर, रेखा देशमुख, अनुराधा आडके, युनुस डांगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
-------------------
शिवपुतळ्याचे काम लवकरच
पालिकेची जुनी इमारत जीर्ण झाली होती. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी नवीन इमारत साकारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून शहराच्या विकासासाठी दोनशे कोटी रुपये निधीचा टप्पा लवकरच पूर्ण करू, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी दिली.
फोटो - २००८२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पालिकेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, अनुराधा आडके, रेखा देशमुख, नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.