शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागलमध्ये चारही गट सावध भूमिकेत; महायुती की वेगळा विचार, यावर ठरणार निवडणुकीचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:37 IST

गावागावात चाचपणी सुरू

जे. एस.शेखकागल : जिल्हा परिषद, पंचायत समीतीचे वारे कागल तालुक्यात वाहू लागले आहे. प्रमुख चार राजकीय गट व्यूहरचना निश्चित करण्यासाठी गावागावातील कार्यकर्त्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तालुक्यात तीन प्रमुख गट महायुतीचे घटक आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट (मुश्रीफ गट), भाजप (संजयबाबा गट) शिंदेसेना (मंडलिक गट), तर राजे गट महाविकास आघाडीचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून तिन्ही गट एकत्र लढणार की, घटक पक्ष वेगळी भूमिका घेणार यावर निवडणुकीचे चित्र रंगणार आहे.तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे मतदारसंघ, तर बारा पंचायत समितीचे मतदारसंघ झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या मंत्री मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे गटात राजकीय जवळीक आहे. तर, माजी खासदार संजय मंडलिक हे मंत्री मुश्रीफ यांच्याशी समान अंतर ठेवून आहेत.समरजीत घाटगे गट जरी एकाकी दिसत असला, तरी मंडलिक गटाबद्दल त्यांची भूमिका सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे मंडलिक गटाच्या भूमिकेवर बरेच कांही अवलंबून आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे सर्वाधिक आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही जास्त राहणार आहे. तालुक्यात इतर पक्ष संघटनाचीही ताकत काही भागात निर्णायक ठरू शकते. युती किंवा आघाड्या होताना या सर्वांचा विचार अपेक्षित आहे.

गतवेळचे राजकारणगत निवडणुकीत शिवसेना म्हणून मंडलिक व संजय घाटगे गट एकत्र लढले होते. तर, राष्ट्रवादी म्हणून मुश्रीफ गट व भाजप म्हणून राजे गट स्वतंत्र लढले होते. निकालानंतर मंत्री मुश्रीफ व संजय मंडलिक यांनी एकत्र येऊन पंचायत समितीत सत्ता स्थापन केली होती. यातून संजय घाटगे गट नाराज झाला होता.

नेत्यांचे वारसदार मैदानात ?माजी सभापती अमरिष घाटगे व वीरेंद्र मंडलिक हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार असतील. तर, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह राहणार आहे. अजून आरक्षण जाहीर झालेले नाही. आरक्षणावरही बरेच कांही अवलंबून आहे. महिला वारसदार म्हणूनही काही नावे पुढे येऊ शकतात.

गत वेळचे बलाबल :

  • जिल्हा परिषद - ५
  • राष्ट्रवादी काँग्रेस - ३ (मुश्रीफ गट)
  • शिवसेना - १ (मंडलिक गट)
  • शिवसेना - १ (संजयबाबा गट)

पंचायत समिती : १०

  • राष्ट्रवादी काँग्रेस - ५ (मुश्रीफ गट)
  • शिवसेना - ४ (मंडलिक गट)
  • शिवसेना - १ (संजय घाटगे)