राजा शिवछत्रपती कालदर्शिकेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST2020-12-31T04:24:58+5:302020-12-31T04:24:58+5:30

कोल्हापूर : प्रसिद्ध चित्रकार प्रमोद मोर्ती यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांच्या कालदर्शिकेचे अनावरण बुधवारी ...

Unveiling of King Shivchhatrapati calendar | राजा शिवछत्रपती कालदर्शिकेचे अनावरण

राजा शिवछत्रपती कालदर्शिकेचे अनावरण

कोल्हापूर : प्रसिद्ध चित्रकार प्रमोद मोर्ती यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांच्या कालदर्शिकेचे अनावरण बुधवारी शाहू छत्रपती यांच्या हस्ते न्यू पॅलेस येथे झाले. यावेळी मर्यादेय वीराजते या चित्राचे तसेच वेबसाईटचेही अनावरण करण्यात आले

कार्यक्रमास इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, प्रसाद पाटील, कल्लापा मोर्ती, प्रदीप पाटील, शिल्पकार ओंकार कोळेकर उपस्थित होते.

या कालदर्शिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अस्सल चित्रे असून, काही नवीन चित्रांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नवे स्वरूप दिले आहे. यात ब्रिटिश म्यूझियम लंडन, चित्रकार मीरमहम्मद यांच्या चित्रसंग्रहातील १७ व्या शतकातील चित्र, जयपूर पोतिखान्यामधील चित्र, इतिहास अभ्यासक प्रसाद पाटील यांनी ब्रिटिश म्यूझियम लंडन येथील लाइन इंग्रेविंगच्या माध्यमातील नव्याने समोर आणलेल्या चित्रांचा समावेश आहे.

--

फोटो नं ३०१२२०२०-कोल-शिव छत्रपती कालदर्शिका

ओळ : चित्रकार प्रमोद मोर्ती यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांच्या कालदर्शिकेचे अनावरण बुधवारी शाहू छत्रपती यांच्या हस्ते न्यू पॅलेस येथे झाले.

-

Web Title: Unveiling of King Shivchhatrapati calendar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.