पन्हाळ्यात अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:07 IST2021-02-20T05:07:57+5:302021-02-20T05:07:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पन्हाळा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चक्क हिवाळ्यात पन्हाळा शहरात ...

Unseasonal rain in Panhala | पन्हाळ्यात अवकाळी पावसाचा फटका

पन्हाळ्यात अवकाळी पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

पन्हाळा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चक्क हिवाळ्यात पन्हाळा शहरात अचानक जोरदार गारांचा पाऊस ९५ मि.मी. इतका जोरदार पडला आहे. अचानक रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः गुऱ्हाळघरांचे व साठवणीच्या गवताचे नुकसान झाले आहे.

हिवाळ्यामुळे आधीच वातावरण थंड आहे, त्यात पाऊस पडल्याने वातावरणात आणखी गारवा पसरला आहे. पन्हाळा तालुक्यात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे पन्हाळा - ९५,

जोतिबा - ९०, कोडोली - २२, कळे - १४, पडळ - १९, बाजारभोगाव - १७, कोतोली- १२ मि.मी.

Web Title: Unseasonal rain in Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.